औरंगाबाद : औरंगाबाद शहरातही आता कोरोनाचा एक रुग्ण आढळण्याने सर्वत्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. औरंगाबादमधील पहिल्या कोरोनाबाधीत 59 वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली जात आहे. सदर महिला ही प्राध्यापिका आहे. तीच्या संपर्कात आलेल्या एका 36 वर्षीय प्राध्यापिकेला कोरोना संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (मिनी घाटी) आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल केले आहे. त्या महिलेचा रिपोर्ट पुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
दोन्ही संशयीताचा झाली सुट्टी
मिनी घाटीत एका 21 वर्षीय आभियांत्रीकी विद्यार्थ्यावर व 71 मुंबई वरुन परतलेल्या 71 वर्षीय महिलेवर संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू होते. या दोन्ही रुग्णांचा स्वॅब अहवाल निगिटिव्ह आल्याने दोन्ही रुग्णांना सुटी देण्यात आली असून त्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय रविवारी 59 लोकांची तपासणी केली तर सोमवारी 32 असे दोन दिवसात एकूण 91 जनांची तपासणी करण्यात आली.